१८ जूलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मूर्म यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. अशात एनडीच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. (congres angry after shivsena support nda candidate)
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे म्हटले जात होते. पण आता उद्धव ठाकरे यांनीच याबाबत मोठी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला. पण त्यानंतर काँग्रेस नाराज असल्याचे दिसून आले आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याआधी आमच्याशी चर्चाही केली नाही, अशी खंत काँग्रेसने व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.
जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. pic.twitter.com/LSykyJ0b6L— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 12, 2022
तसेच गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले. अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. थोरात यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
बाळासाहेब थोरातांचे ट्विट-
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.
शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या सिक्सरने चिमुकली झाली जखमी, नंतर हिटमॅनने दिले तिला ‘हे’ खास गिफ्ट
मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत
अदानी समुहाच्या मुंद्रा बंदरावर पोलिसांची कारवाई, छापेमारीत सापडलं तब्बल ३७५ कोटींचे हेरॉइन