रशिया आणि युक्रेन यांच्यातील रशियन-युक्रेन युद्धाचा जगातील आर्थिक घडामोडींवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशात आता रशियातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेनच्या या युद्धादरम्यान रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत १७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. (condom sale increase 170 percent)
ब्रिटनमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. युद्धाच्या वातावरणात रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत वाढ झाली आहे, पण त्याच्या मागचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे. रशियामध्ये कंडोमचा तुडवडा निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते, त्यामुळे कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियामध्ये पाश्चिमात्य निर्बंधांमुळे देशात कंडोमच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच तेथे कंडोमचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रशियातील कंडोमच्या विक्रीत वाढ दिसून आली आहे. तसेच ही तेजी अशावेळी दिसून येत आहे, जेव्हा ड्युरेक्स आणि अन्य ब्रँडचे कंडोम बनवणारी ब्रिटीश कंपनी रेकिटने आपला व्यवसाय अजूनही रशियामध्ये सुरु ठेवला आहे.
रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन विक्रेता वाइल्डबेरीज यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात कंडोमच्या विक्रीत १७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी फार्मसी साखळी ३६.६ PJSC ने विक्रीत २६ टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे.
RBC च्या अहवालानुसार केमिस्टकडून कंडोमची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, सुपरमार्केटने म्हटले आहे की त्यांची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. Prezervativnaya सेक्स शॉपच्या सह-मालक येसेनिया शमोनिना म्हणाल्या की, वेगवेगळ्या ब्रँड्सच्या कंडोमच्या किंमतीत ५० टक्क्यांनी वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा
बिग ब्रेकींग! ईडीने आता मातोश्रीलाच घेरले, ठाकरेंच्या भावाची कोट्यावधींची संपत्ती जप्त
अक्षय कुमारने ‘सेल्फी’ चित्रपटात ‘या’ दोन अभिनेत्रींचे केले स्वागत; म्हणाला, ‘होऊन जाऊदे मुकाबला’