Share

कंपनीची एक चूक अन् कर्मचारी झाला करोडपती, पैसे मिळताच कर्मचारी फरार; वाचा नेमकं काय घडलं..

आपल्या सर्वांना माहीत आहे की, महिनाभर काम केल्यानंतर कर्मचारी ज्या तारखेची वाट पाहत असतात ती तारीख म्हणजे पगार होण्याची तारीख. कारण याच पगाराने संपूर्ण महिन्याचा खर्च भागत असतो. इतकेच नाही तर अनेक वेळा महिन्याच्या शेवटच्या दिवसात लोकांचे पैसे संपतात त्यामुळे ते निष्फळ खर्च करण्याचं नेहमी टाळत असतात.

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागते आणि त्यांना पगाराचे महत्त्व चांगलेच ठाऊक असते. त्याच पगारावर त्यांचे पुर्ण घर चालत असते. तसेच एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तुचे हफ्तेही त्याच पगारातून कट होत असतात. पगार जर कमी असेल तर त्यांना आवडीच्या वस्तूंचाही त्याग करावा लागतो.

पण जेव्हा कंपनीकडून पगाराचे वाटप होताच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. मात्र, एका विचित्र प्रकरणात एका कर्मचाऱ्याला त्याच्या विचारापेक्षा जास्त पगार मिळाला, त्यानंतर तो राजीनामा देऊन गायब झाला. होय, कंपनीने चुकून एका कर्मचाऱ्याला हजारो-लाख नव्हे तर एक कोटींहून अधिक पगार दिला.

कर्मचाऱ्याला त्याच्या वेतनाच्या 286 पट जास्त पगार देण्यात आला होता. पण ही कंपनीची चूक होती. त्यांच्याकडून चुकून त्या कर्मचाऱ्याच्या अकाऊंटमध्ये 1.42 कोटी रुपये जमा झाले होते. या घटनेनंतर, कर्मचार्‍याने आपल्या पदावरचा राजीनामा दिला आणि त्याच्या कंपनीला जादा भरलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन तो नंतर बेपत्ता झाला आहे.

चिलीमधील सेसिनास ही सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी कर्मचार्‍यांचे पगार ट्रान्सफर करत असताना कंपनीकडून खुप मोठी चूक झाली. स्थानिक मीडियानुसार, कंपनीने चुकून कर्मचार्‍यांना 500,000  डॉलर्स म्हणजे जवळपास 1.42 कोटी रुपये दिले आहेत. या एका चुकीमुळे कंपनीचे खुप नुकसान झालं आहे.

ही संपूर्ण घटना फूड इंडस्ट्रियल कन्सोर्टियमच्या एचआर सेक्टरमध्ये घडली. ही एक कंपनी आहे जी सॅन जॉर्ज, ला प्रीफेरिडा आणि विंटर सारख्या महत्त्वाच्या चिली ब्रँड्सवर नियंत्रण ठेवते. दरम्यान, सध्या ही घटना सगळ्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेक जणांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्या कर्मचाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे तर काहींनी त्याने बरोबर केलं असं लिहीलं आहे.

महत्वाच्या बातम्या
नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर संतापला इरफान पठाण; हल्लेखोरांना म्हणाला..
आम्हा मुलींच्या जन्माचं तुम्ही…; प्राजक्ता माळीने शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट होतेय तुफान व्हायरल
एका युक्तीने पालटले व्यक्तीचे नशीब, फळं विकून उभी केली तब्बल 300 कोटींची कंपनी, वाचा यशोगाथा
मदतीसाठी देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंना हाक…; ठाकरे म्हणाले…

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now