Share

कोरोना असो किंवा नसो, आयुष्यभर सुरू राहिल ‘वर्क फ्रॉम होम’, ‘या’ कंपन्या देत आहेत संधी

कोरोनाच्या काळात कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावणे सुरू केले आहे. परंतु अर्ध्याहून अधिक कंपन्या अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा पर्याय खुला ठेवतात.(companies-are-giving-the-opportunity-to-work-from-home-for-life)

काही कंपन्यांनी तर कायमस्वरूपी घरून काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. 2020 मध्ये, कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन(Lockdown) लागू करण्यात आला. त्यानंतर कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली. ही व्यवस्था दीर्घकाळ सुरू राहणार असल्याचे अनेक कंपन्यांचे अधिकारी सांगतात.

मॉंडेलेझ आणि टाटा स्टील सारख्या कंपन्यांनी सांगितले की ते अशा कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत जे कायमस्वरूपी घरून काम करतील. दुसरीकडे, मारुती सुझुकी, एमफोसिस आणि आयटीसी आठवड्यातून काही दिवस कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत आहेत. ही व्यवस्था दीर्घकाळ सुरू राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.

CIEL HR चे मुख्य कार्यकारी आदित्य मिश्रा(Aditya Mishra) म्हणाले की, सध्या घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणताही बदल झालेला नाही. परंतु ज्यांना घरून कायमस्वरूपी कामासाठी नियुक्त केले जात आहे त्यांना 15 टक्के कमी पगार दिला जात आहे.

सर्वेक्षणानुसार, नवीन नियुक्त्यांपैकी सुमारे 10 टक्के लोक असे आहेत जे कायमस्वरूपी घरून काम करतील. या सर्वेक्षणात, CIEL HR ने देशभरातील IT, ITeS, Ecommerce, BFSI, भर्ती, सल्ला आणि एडटेक क्षेत्रातील सुमारे 600 कंपन्यांचा मागोवा घेतला आहे. यात सुमारे 1000 लोकांनी सहभाग घेतला.

शिल्पा वैद्य, एचआर हेड, मॉंडेलेझ म्हणाल्या, “आम्ही लिमिटेड लेवलवर रिमोट रोल्स पाहत आहोत. कारण आम्हाला आमच्या व्यवसायासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम धोरणे हवी आहेत. ऑफिसमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणताही फरक नाही.

डिसेंबर 2020 मध्ये, पोलाद कंपनी टाटा स्टीलने Agile Woking Modelचे धोरण स्वीकारले. या अंतर्गत नोकऱ्या दोन श्रेणींमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या श्रेणीत कर्मचाऱ्यांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून कायमस्वरूपी काम करण्याची सुविधा देण्यात आली होती.

दुसरी श्रेणी अशा अधिका-यांची होती जी विशिष्ट ठिकाणी तैनात असतात. हे लोक वर्षातून हवे तितके दिवस घरून काम करू शकतात. टाटा स्टीलच्या प्रवक्त्याने सांगितले की कंपनी दोन्ही पदांसाठी भरती करत आहे आणि यांच्या पगारात फरक नाही.

देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी हायब्रीड मॉडेलचा अवलंब करत आहे. कंपनीचे कार्यकारी मंडळ सदस्य राजेश उप्पल म्हणाले की, उत्पादन आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून कंपनीने धोरण लवचिक केले आहे.

सर्वेक्षणानुसार, बहुतेक मोठ्या कंपन्या काही भूमिकांसाठी कायमस्वरूपी घरून काम करण्याचा(Work From Home) प्रचार करत आहेत. मध्यम आकाराच्या IT/ITES कंपन्या, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, रिटेल, केमिकल, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन क्षेत्रात, 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत.

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now