Share

भाजपशिवाय शिवसेनेला भवितव्य नाही, अजूनही अडीच अडीच वर्षाच्या फाॅर्म्युल्यावर एकत्र या- केंद्रीय मंत्र्याचे जाहीर आवाहन

udhav thackeray

विधानसभा निवडणुकीचे बहुतेक निकाल हाती आले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पाहायला मिळले. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे.

तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं देशभरात पाळंमुळं रोवण्याच्या दृष्टीने तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार दिले. पण निवडणूक निकालांमध्ये शिवसेनेचं पानिपत होत आहे.

शिवसेनेने तब्बल शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. पण त्यांच्या एकाही उमेदवाराला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याचाच धागा पकडत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्यापेक्षा माझा पक्ष हा इतर राज्यांमध्ये बळकट आहे. मणिपुरमध्ये आमचा उमेदवार केवळ १८३ मतांनी पराभूत झाला. शिवसेनेला बाहेरील राज्यात यश मिळणं अशक्य आहे,” असंही आठवले म्हणाले.

याबाबत माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, इतर राज्यात माझा पक्ष शिवसेनेपेक्षा स्ट्राँग आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेत शिवसेनेला 3-4 जागा तरी येतील की नाही ही शंका असून विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार असल्याचं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.

याचबरोबर अजूनही वेळ गेलेली नाही महाराष्ट्रात शिवसेनेने अडीच अडीच वर्ष फॉर्म्युलावर एकत्र यावं, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही असंही आठवले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
अखेर कपिल शर्माने ‘काश्मिर फाईल्स’च्या वादावर सोडले मौन, म्हणाला, आजच्या सोशल मिडीयाच्या जगात..
टॉमेटॉ बॉम्बच्या जीवावर युक्रेन करतोय बलाढ्य रशियावर मात, वाचा नक्की काय आहे टॉमेटो बॉम्ब?
“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका
शिक्षीका विद्यार्थ्यासोबत करायची सेक्स, पालकांनी विचारल्यावर म्हणायची मी त्याच्या गर्लफ्रेंडची आई आहे

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now