कर्नाटकात हिजाबचा वाद सुरूच आहे. यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असतानाच आता म्हैसूरमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका कॉलेजमध्ये ड्रेस कोड हटवण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुस्लिम मुलींना वर्गात हिजाब घालून येण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. (college allowed hijab)
मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी या खाजगी महाविद्यालयाला द्यायची होती. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी आपल्या महाविद्यालयाचा ड्रेस कोड रद्द केला आहे. त्यानंतर आता विद्यार्थीनींना वर्गात हिजाब परीधान करुन बसता येत आहे.
म्हैसूरचे डीडीपीयूचे डीके श्रीनिवास मूर्ती म्हणाले की, चार मुलींनी हिजाबशिवाय वर्गात जाण्यास नकार दिला आणि विरोध केला. त्याला काही संघटनांनी पाठिंबा दिला. मी आज कॉलेजला भेट देऊन सर्वांशी चर्चा केली. तसेच महाविद्यालयाने जाहीर केले की ते विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची परवानगी देणारा ड्रेस कोड रद्द करत आहे, असेही ते म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी याआधीच सांगितले आहे की, आता विद्यार्थ्यांप्रती कोणतीही उदासीनता राहणार नाही. तसेच अंतरिम आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकातील तुमकूरमध्ये १० विद्यार्थ्यांवर कायदा मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हिजाब आणि बुरखा परिधान केलेल्या काही मुस्लिम विद्यार्थिनींनी तुमकूरच्या गर्ल्स एम्प्रेस गव्हर्नमेंट पीयू कॉलेजच्या बाहेर प्रवेश रोखल्यानंतर हिजाबच्या नियमाचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून ‘अल्लाह-हु-अकबर’च्या घोषणाही दिल्या. १७ फेब्रुवारी रोजी तुमकूर येथे झालेल्या निषेधावर कारवाई करत कर्नाटक पोलिसांनी १० मुलींविरुद्ध आयपीसी कलम १४०, १४३, १४५, १८८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
हिजाब वादाच्या संदर्भात सुनावणीदरम्यान कर्नाटक हायकोर्टाने सांगितले होते की, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे. तोपर्यंत कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी धार्मिक पोशाख घालून महाविद्यालयात जाणार नाही. परंतू असे असतानाही म्हैसूरमधील एका महाविद्यालाने विद्यार्थीनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
पोलिसांना थेट धमकी देणे एमआयएमच्या नेत्याला पडले महागात; दुसऱ्याच दिवशी ठोकल्या बेड्या
…तर मग कोणी पण कोणाच्याही घरावर दगड फेक करेल; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
माझी हत्या होऊ शकते; पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं खळबळजनक विधान