Share

एकेकाळी मुख्यमंत्र्यांचा जाहीरपणे समाचार घेणाऱ्या खासदाराचा आता ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले..

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (cogress leader support to uddhav thackeray)

महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत येण्याचे आवाहन केले होते. पण तसे काही घडले नाही. आता राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेनेत फुट पडली आहे. पण हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमाने आणि शांततेने सोडवला पाहिजे. शांततेच्या मार्गाने हा विषय सोडवला तर ५० टक्के आमदार परत येतील, असे धानोरकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रावादीसोबत सरकार चालवले आहे. मात्र आता अचानक असे काय झाले की आमदारांनी बंडखोरी केली? या मागे नक्कीच भाजपचा हात असणार असे म्हणत धानोरकर यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

या बंडखोर आमदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ नको असेल तर आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ. मात्र भाजपला रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, असे धानोरकर यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंताही व्यक्त केली आहे. समेट व्हायला हवा, नाही तर ही दरी आणखी वाढेल आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळेल, असे धानोरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी धानोरकर हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राज्य सरकारविरोधात उघड भूमिका घेतली होती. आता सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार चालले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! नाईट क्लबमध्ये मृत्यूच तांडव, आत्तापर्यंत सापडले २२ जणांचे मृतदेह
“कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवलेत, बळी द्या”
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर पडली प्रेमात; स्वत:च कबुली देत म्हणाली..

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now