राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर भाष्य केलं होतं. तसेच ठाकरे सरकारने निर्णय घेऊन लवकरात लवकर मशिदींवरील भोंगे खाली घ्यावे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.
राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेला भाजपने पाठिंबा दर्शवला होता. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मशिदींवरचे भोंगे काढू शकतात, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भोंगे का काढू शकत नाही? असा सवालही अनेक नेत्यांनी उपस्थित केला होता.
आता याच प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देत सर्वांचे तोंड गप्प केले आहे. उद्धव ठाकरेंनी भोंग्यांच्या विषयावर उत्तर देताना थेट कोरोना काळाचा संदर्भ दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर भाष्य करुन कोणी कोणत्या गोष्टीत लोकप्रियता घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
मुख्ममंत्र्यांनी एक मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांना मशिदींवरील भोंग्याबाबतचा हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विरोधकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात गंगेत प्रेतं फेकली गेली होती. ७० हून अधिक मुलं ऑक्सिजन मिळाले नाही, म्हणून दगावली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
तसेच उत्तर प्रदेशात कोरोना काळात किती जणांना आपले प्राण गमवावे लागले, त्याचा आकडा अजून आलेला नाही. कोरोना काळात उत्तर प्रदेश सरकारने दुर्लक्ष केलं. काम केलं नाही. ते काम करुन ते लोकप्रिय झाले नाहीत. हे काम करुन ते लोकप्रिय होत असतील तर त्यांची लोकप्रियता त्यांनाच लखभाल असो. मला जनतेच्या जीवाची पर्वा आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.
उत्तर प्रदेशात योगींनी भोंगे हटवले ते हिंदूत्वाचं काम नव्हतंच. ते सर्वधर्म समभावाचं काम होतं. तसेच उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरवले असले तरी पुन्हा भोंगे लावायला परवानगी मागितली तर ते पुन्हा भोंगे लावायाला परवानगी देतील. त्यामुळे युपीत सर्वांनाच भोंगे लावण्याची परवानगी मिळणार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुमच्या दुर्गेला विवस्र नाचायला कुणी भाग पाडलं? त्यावेळी तिला वाचवलं कुणी? वादग्रस्त विधाने सुरूच
चंद्रमुखीच्या लव्ह ट्रॅंगल’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; कमाईच्या बाबतीत बाॅलीवूडला टक्कर
चंद्रमुखी’ने आपल्या सौंदर्य अन् लावणीने प्रेक्षकांना घातली भुरळ; दोनच दिवसात कमावले तब्बल …