Share

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर मी करणार आहे पण ‘या’ कारणामुळे करत नाही- उद्धव ठाकरे

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत नक्की काय बोलतील याबाबत चर्चा होत होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे. (cm uddhav thackeray on aurangabad name)

या सभेत उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच भाजपवरही हल्लाबोल केला आहे. २५ वर्षे जे आमच्या मांडीवर बसलेले होते, तेच आता आमच्या छाताडावर बसलेले आहे, जे मित्र होते, ते वैरी झाले आहे, जे वैरी होते ते मित्र झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

तसेच एक काळ होता जेव्हा भाजप-शिवसेना राजकारणात अस्पृश्य होतो, करण हिंदुत्ववादी. २५-३० वर्षे तुम्ही आमचा उपयोग करून घेतला. आता सत्ता आल्यावर शिवसेना तुम्हालाच खुपायला लागली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले आहे.

नामर्दांच हिंदुत्व आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबावरही भाष्य केले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

तसेच देशाची रक्षा करता करता औरंगजेबाने बलिदान दिलं त्याला आम्ही परकं म्हणत नाही, तो आमचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या शहराचे नामांतर मी करणार आहे, पण संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असे नगर मी करणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शब्द देऊन उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंनी टाकला बॉम्ब; भाजपवर केले गंभीर आरोप
काळजीचे कारण नाही! फक्त एका औषधानेच केला चमत्कार; कॅन्सर होणार पूर्णपणे बरा..
रात्री सप्तपदी घेतली आणि सकाळी लग्नच मोडले; नववधूने सांगितलेलं कारण ऐकून बसेल जबर धक्का

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now