राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे भाजप – शिवसेना पुन्हा एकतर येऊन राज्यात सत्ता स्थापन करणार का? याबद्दलच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचा दावा सध्या करण्यात येत आहे. याचबरोबर ठाकरेंनी भाजपाच्या श्रेष्ठींसोबतही संवाद साधण्याचा प्रयत्न केला असल्याच बोललं जातं आहे.
शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी ठाकरेंनी थेट फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर आहे. शिवसेनेचे काही नेते आसाम गुवाहाटीला गेले आहेत, तर काही मुंबईत राहिलेले आहेत. यामुळे असं पक्षात विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा सेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना केलेल्या फोनच वृत्त शिवसेनेणे फेटाळून लावलं आहे. “सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा असल्याच स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.
तसेच उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये,” असं आवाहन देखील शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. अलीकडेच एक वृत्त प्रसारित झाले होते की, ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं.
यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील गुप्त चर्चा झाल्याच बोललं जातं आहे. यामुळे आता राज्यात नक्की सरकार कोणाच येणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.