Share

RSS ची बाजू घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर केलेली टीका श्याम देशपांडेंना भोवली, शिवसेनेने केली हकालपट्टी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही टीका त्यांना चांगलीच भोवली आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आता देशपांडे यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (cm order to out shyam deshpandey)

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने याबाबत निर्णय जाहीर केला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा आरोप श्याम देशपांडे यांच्यावर करण्यात आला आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. श्याम देशपांडे यांच्या हकालपट्टीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडणी केलेल्या हिंदुत्वाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक दिशा दिली होती. मात्र संघावर अकारण राजकीय टीका करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही दिशा भरकटवली आहे. संघाला राजकीय वादामध्ये प्रत्यक्ष ओढून शिवसेनेने काँग्रेसची री ओढली आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर श्याम देशपांडे यांनी आपले काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्याम देशपांडे यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाई श्याम देशपांडे यांनी केली आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडूनही जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना ही संघटना निष्ठवंतांची असून देशपांडेंना तीन वेळा पालिकेत संधी देण्यात आली होती. स्थायी समितीचं अध्यक्षपद, गटनेता, शहरप्रमुख, ही पदे आणि विधानसभेची उमेदवारी देऊनही ते समाधानी नव्हते, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांवर टीका करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात; पुण्यातील बड्या नेत्याची हकालपट्टी
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलीस लाच घेताना अटकेत; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाठ्याकाठ्यांनी चोपलं, शाळकरी मुलींच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now