शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते.
मात्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. स्व: ता फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की, शिंदेंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. फडणवीस स्व: ता मंत्रिमंडळातून बाहेर राहणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा जनतेची मन जिंकली आहे. ट्विटमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा.’
https://twitter.com/OfficeofUT/status/1542538623303979008?s=20&t=3H1GRQWxfhjcHz9K0JQ36Q
दरम्यान, उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतू ते एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला गेले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या देखील चर्चा समोर आल्या. मात्र अखेर उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पत्रक सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रकामध्ये लिहिले आहे की, “श्री. एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तुत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पाऊल टाका.”
महत्वाच्या बातम्या-
मराठा समाजासाठी आनंदाची बातमी! आरक्षणासंदर्भात ठाकरे कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय
कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
आतापर्यंत जगापासून लपलेले आहे कामाख्या मंदिराचे ‘हे’ रहस्य, वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! पुण्यातील ‘हा’ माजी मंत्रीही होणार शिंदे गटात सामील