मात्र आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्यांनी बहुमत चाचणीत आज शिंदे गटाला मतदान देखील केलं. मात्र काही दिवसांपूर्वीच बांगर यांनी बंडखोरांवर जहरी शब्दात टीका केली होती. अचानक बांगर यांनी निर्णय का बदलला? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
यावर आता खुद्द नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. बांगर यांनी शिंदे गटात सामील कसे झाले? याचे उत्तर शिंदे यांनी दिलं आहे. याबाबत बोलताना ‘बांगर यांनी रात्री दीड वाजता मला फोन केला,’ असा खुलासा शिंदे यांनी केला आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं असा खुलासा शिंदे यांनी केला.
याचबरोबर बांगर यांनी आणखी तीन ते चार लोक असल्याच देखील सांगितलं, त्यांचही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही, असं शिंदे यांनी सांगितलं आहे. ते याबाबत पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावात शिंदे गटामध्ये बांगर यांच्या रुपाने आणखी एक आमदार सहभागी झाल्याने शिवसेनाला धक्का बसला आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच बांगर यांनी बंडखोरांवर जहरी शब्दात टीका केली होती. आता त्यांच ते पूर्वीच व्यक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे.
बंडखोरांना लक्ष करताना पूर्वी बांगर यांनी म्हंटलं होतं की, ‘ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेइमानी करता, अशा बेइमान लोकांचे काही भले होणार नाही. त्यांच्या बायका यांना सोडून जातील, या बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही. ते मुंजेच राहतील.’ मात्र आज त्यांची भूमिका बदलेली पाहायला मिळाली.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मविआ सरकार पडताच शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; सूड घ्यायला सुरवात?
उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून सगळी जबाबदारी एकनाथ शिंदेंला दिली त्याचा हा परिणाम- शरद पवार