Share

Eknath Shinde : ‘तु बहूत उड रहा है, अब तेरे मौत का ऐलाव हो चूका है, बचा सके तो बचा लो’; शिंदेंच्या जवळच्या माणसाला जाहीर धमकी

Eknath Shinde

cm eknath shinde osd rahul gethe threat|   नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष कार्य अधिकारी राहूल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे ओएसडी म्हणून कार्यरत असलेले डॉ.गेठे यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.

गेठे यांचे नवी मुंबईतील बेलापूर शहरातील घरी लाल शाईने लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हे पत्र पोस्टातून त्यांच्या घरी आले आहे. डॉ.राहुल गेठे यांच्यासाठी हा शेवटचा इशारा असल्याचे या पत्रात लिहिले आहे. सीपीआयएम भामरगड एटापल्ली समितीने हे पत्र पाठवले आहे.

डॉ.राहुल गेठे यांना हा शेवटचा इशारा, एकनाथ शिंदे यांचा अधिकारी राहूल गेठे खुप उडतोय. तो आमचे खुप नुकसान करतोय. आम्ही आमच्या भावांचा बदला लवकरच घेणार आहोत. त्याच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारला त्याला वाचवायचं असेल तर त्यांनी वाचवून घ्यावं, असे त्या पत्रात म्हटले आहे.

खरे तर डॉ.राहुल गेठे हे गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोलीतील शासनाच्या योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम बघत आहे. कोर नक्षल भागात उभारण्यात येत असलेल्या सूरजगड खाण प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार असून, या महामार्गाचा विस्तार आता गडचिरोलीपर्यंत होणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे.

त्याचबरोबर हवाई वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी गडचिरोलीत हवाई पट्टी बांधण्याचीही सरकारची योजना आहे. गेठे कौशल्य विकासाशी संबंधित आणखी एका प्रकल्पावर काम करत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील तरुण नवनवीन तंत्र शिकून स्वत:चा व्यवसाय करू शकतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी अनेक विकास कामांची घोषणा केली होती. ही सर्व विकास कामे वेळेत पुर्ण करण्याची जबाबदारी राहूल गेठे यांना देण्यात आली. ती विकास कामे न सुरु करण्यासाठी त्यांना आता पुन्हा धमक्या दिल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now