eknath shinde : राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. दोघांमधील वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला आहे.
कडू आणि राणा यांच्यातील वादामुळे शिंदे – फडणवीस सरकारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्याच्या राजकारणात गुवाहाटी हे ठिकाण चर्चेत आले आहे.
शिंदे यांनी आमदारांना घेऊन थेट गुवाहाटी गाठले. शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. यावर अद्याप शिंदे गटातील आमदारांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे गुवाहाटीचा कामाख्या देवीच्या दर्शनासाठीचा दौरा आणि दुसरा म्हणजे अयोध्या दौरा असल्याच बोलल जातं आहे.
दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र असं असलं तरी देखील अद्याप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये. यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच बोलल जातं आहे. तसेच बच्चू कडू कदाचित नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर