अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या फॅशन सेन्समुळे प्रसिध्द आहे. बिगबॉस मधून पहिल्याच आठवड्यात बाहेर पडलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत असते. मागील आठवड्यात तिची एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. ज्यामध्ये तिने अंग झाकण्यासाठी फक्त नाश्त्याची प्लेट व ज्यूसच्या ग्लासचा वापर केला होता.
याआधी देखील सेफ्टी पिन्स, ब्लेड, गोणपाट वापरुन तिने तिचे बोल्ड आउटफिट बनवले होते. उर्फीच्या अजब फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र बऱ्याचदा तिला टीकांना सामोरे जावे लागते. भाजप ( BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच उर्फीला तिच्या फॅशन सेन्स वरून चांगलेच सुनावले होते.
उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तिच्या अटकेची मागणी केली होती. तसेच ‘नंगटपणा करणारी बाई’ या शब्दांत त्यांनी उर्फीवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीला चांगलेच सुनावले आहे.
“व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली सगळीकडे स्वैराचार चालला आहे. चार भिंतीच्या आत तुम्ही काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवर असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या आहेत.
प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी म्हणून आम्ही पोलिसात तक्रार केल्याची माहिती व कारवाईचा इशारा उर्फी जावेदला देण्यात आला आहे. चित्रा वाघ यांच्या टिकेनंतर उर्फी जावेद हिने केलेल्या ट्विट चा संदर्भ घेत देखील चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलल्या आहेत.
उर्फीने ज्या भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे. “तिने आज ट्वीट केले आहे, पण जर उद्या मला कुठे भेटलीच तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि नंतर ट्वीट करेन. मग काय व्हायचं असेल ते होऊद्या, मात्र आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही.” असे म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीला गंभीर इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
1880 च्या काळातील ‘हे’ कोडे माहितीय का? लाखात एक बुद्धिमान व्यक्तीच ते सोडवू शकतो
“मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी…”, कोरेगाव भीमा लढाईबद्दल केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य
कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी