शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणात चित्रा वाघ अडकण्याचीही शक्यता वाढली आहे. (chitra wagh reaction on girls allegation)
मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले आहे, असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे बलात्काराचे प्रकरण लावून धरले होते. पण त्यानंतर आता तरुणीने चित्रा वाघ यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितले होते. त्यासाठी माझ्या मोबाईलमधून एका ऍपच्या साहाय्याने मेसेज पाठवण्यात आले होते. तसेच वाघ यांनी मला गोव्यात डांबून ठेवले होते. तसेच पोलिसांना विशेष जबाब देण्यासही मला भाग पाडले होते, असे तरुणीने म्हटले आहे.
आता याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी जर तिच्यावर दबाव आणून आरोप करण्यास तिला भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? हेच मला कळत नाहीये. विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर परीणाम झालेला आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
तसेच मी बलात्काऱ्यांना पाठीशी घातले, असे आरोप माझ्यावर झाले होते, मग त्यावेळी कोण पुढे का आलं नाही? याप्रकऱणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, कसल्या प्रकारचे माझ्यावर गंभीर आरोप झाले आहेत, मला तर काहीच समजत नाहीये, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
मी पीडित मुलीला फोन केला होता. आपल्याला लढायचे असेल तर काही गोष्टींची तयारी करावीच लागेल. मी तिला मदतच केली आहे. पण आता हे सगळं कशासाठी होतंय हे मला काही माहित नाही. त्या मुलीला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती. बाकी कोणताही हेतू माझा नव्हता. त्यामुळे जे आरोप होताय, त्याला मी उत्तर देईल. मी दबाव आणला असले, तर माझी चौकशी करा, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
…मग राजसाहेब ठाकरेंनी काय चूक केली?
आदित्य ठाकरेंनी भाजपविरोधात थोपटले दंड; ‘महाविकास आघाडीचा पॅटर्न देशातही पुढे नेऊ’
सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मनसे आक्रमक; उपस्थित केला ‘हा’ संतप्त सवाल