Chitra wagh | शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राठोड यांचा मंत्रिंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर विरोधक संतापले आहेत. त्यामध्ये काही भाजप नेत्यांचाही समावेश आहे. चित्रा वाघ यांनीही भाजपला घरचा आहेर दिला आहे. कारण संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या चित्रा वाघच होत्या.
त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. पण आता त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने चित्रा वाघ संतापल्या आहेत. दिल्लीत पत्रकारपरिषदेदरम्यान त्यांनी महाविकास आघाडीला संतप्त सवाल केला की, संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली?
तसेच त्या पुढे असंही म्हणाल्या की, जर पिडीत मुलीला न्याय मिळणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. संजय राठोड यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, कोण मला चांगलं बोलत आहे, वाईट बोलत आहे याला मी कधीच महत्व देत नाही. माझा लढा मी लढणार आहे.
मला कोणी निंदावं, कोणी वंदावं यामुळे मला फरक पडत नाही. ती महाराष्ट्राची मुलगी होती. त्या मुलीसाठी लढणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. पुढे त्या म्हणाल्या की, संजय राठोड यांच्याविरोधात मी याचिका दाखल केली आहे, त्याच्या तारखाही सुरू आहेत.
कोर्टाने राज्य सरकारकडून रिपोर्ट मागवला होता. महाविकास आघाडीने आणि ठाकरे सरकारने संजय राठोडला क्लीन चिट दिली होती. राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांनी संजय राठोडला क्लीन चिट दिलीच कशी? हे विचारलं पाहिजे.
पुणे पोलिसांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे सांगितले होते. मग आता क्लीन चिट कशी दिली? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आम्ही राठोड यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी असं जर वाटत असेल त्यांना करूणा मुंडेंची माफी मागावी लागेल. तेवढं मोठं मन आहे का? ती महिला हक्कासाठी आली होती, असं चित्रा वाघ म्हणाली. तिची धिंड काढली, तिच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आलं, जेलमध्ये टाकलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनीही तिचे पाय धरले पाहिजेत असं चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
Anjali arora video : ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS झाला लीक? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण
संपलेली बिडी घराबाहेर फेकली अन् संपूर्ण कुटुंबाचा झाला अंत, घटनेने महाराष्ट्रात हळहळ
Eknath Shinde : सर्व मलाईदार खाती भाजपकडे तर जुनी खाती शिंदे गटाला, बंडखोरी करून कमावलं की गमावलं?
VIDEO: पितळ उघडं पडताच सुष्मिताने ललित मोदींना दिला धोका, एक्स बॉयफ्रेंडचा पकडला हात