भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून केला होता, असा खुलासा आता पीडित तरुणीने केला. (chitra wagh allegation on shivsena leader)
पीडित तरुणीने चित्रा वाघ यांनी तिला खोटी बलात्काराची तक्रार द्यायला लावल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात तरुणीने सुरेश धस आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने वेगळं वळणं घेतलं आहे.
पीडित तरुणीच्या आरोपामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना आता चित्रा वाघ यांनी तरुणीच्या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात व्हिडिओ शेअर करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या व्हिडिओमधून त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.
मेहबूब शेखवर आरोप करणाऱ्या पीडितेने घुमजाव करत चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असे चित्रा वाघ यांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.
तसेच याआधी शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानेही एका बलात्कारी पीडित तरुणीवर दबाव टाकला की चित्रा वाघ यांनी हे करायला भाग पाडलं हे सांगावं. त्यानंतर त्या मुलीने माझं नाव घेतलं. पण ८ ते १० दिवसांत सत्य समोर आलं होतं, असेही चित्रा वाघ यांनी व्हिडिओतून म्हटले आहे.
समाज कारणात काम करताना असे अनुभव येत असतात. ते आम्हाला काही नवीन नाही. आम्ही पहिल्या दिवसांपासून तिला मदतच केली आहे. असे अनुभव येत असतात म्हणून आम्ही काम करणं थांबवत नाही. ज्या ज्या ठिकाणी अशी राजकीय धेंडं येतात तिथे अशी परिस्थिती उद्भवणं स्वाभाविक आहे. चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे
महत्वाच्या बातम्या-
महाबळेश्वर फिरण्यासाठी येणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने आवश्यक; महापालिकेने घेतला मोठा निर्णय
बड्या पक्षाच्या आमदाराने स्वत:च्याच लग्नात लावली गैरहजेरी, संतापलेल्या नवरीने उचललं ‘हे’ धक्कदायक पाऊल
विधान परिषदेच्या तोंडावर रवी राणांना झटका; अमरावती पोलिसांकडून अटक वॉरंट जारी