Share

दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचंच घर बिहारमध्ये फुटणार, चिराग पासवान यांनी दिले संकेत

महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सत्तानाट्य घडून आलं. त्याप्रमाणे बिहार राज्यात देखील सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा चिराग पासवान यांनी केला आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना लोकांची घरं फोडणाऱ्यांचं घर फुटतच, अशा टोकदार शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला. (Chirag Paswan hinted that the house of BJP, is breaking)

बिहारमध्ये सध्या अस्तित्वात असलेले नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयु आणि भाजप युतीचे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे बोलले जाते. नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रेससोबत हात मिळवत नवी आघाडी स्थापन करण्याच्या मार्गावर असल्याची कुजबुज आहे.

बिहार राज्यामध्ये सत्तेवर असलेले सरकार स्थिर होईपर्यंत कोसळते हा इतिहास आहे. राज्यामध्ये सतत राजकीय बदल होत असतात. या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी भाष्य केले. ज्यांनी लोकांचे घर फोडले त्यांच्याच घरात आता फूट पडली आहे, असे पासवान यांनी म्हंटले.

नितीश कुमार लवकरच आरजेडी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही वर्षांपासून ज्यांच्या विरोधात लढले. त्यांच्याच सोबत सत्ता स्थापन केली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रामविलास पासवान यांची प्रकृती स्थिर नसताना आणि ते गेल्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी त्यांचा मुलगा चिराग पासवान यांच्यावर येऊन पडली. पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची भाजपसोबत युती होती.

मात्र लोक जनशक्ती पक्षाला डावलण्यात आले आणि भाजपने जेडीयूसोबत युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केले. भाजपने असं करण्यामागे नितीश कुमार आणि जेडीयुचा हात असल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पण बाकीचे…, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाच सवाल
शिंदे गटाने पकडली ठाकरेंची ‘ती’ मोठी चूक, निवडणूक आयोगापुढे सादर करणार पुरावे
शिवसेनेप्रमाणे ‘या’ पक्षातही फुट पाडण्याचा भाजपचा होता प्लॅन, कोण होता तेथील एकनाथ शिंदे?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now