Share

हनुमानाचे नाव ऐकून रावण सुडाने पेटला असेल; राणांची भेट घेतल्यावर चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री इथे हनुमान चालिसा म्हणण्याच्या वादावरुन खासदार नवनीत राणांना अटक करण्यात आली होती. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि शांतता भंग करण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. (chira wagh meets navneet rana)

नवनीत राणा आणि रवी राणा गुरुवारी जेलमधून बाहेर पडले आहे. कारागृहात राहून खुप त्रास झाल्याने नवनीत राणांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

राणा दाम्पत्याला बुधवारीच सशर्त जामीन मंजूर झाला होता. पण न्यायालयाच्या आदेशाची प्रत साडेपाचपर्यंत न पोहचल्यामुळे त्यांना बुधवारची रात्रही कारागृहातच काढावी लागली. त्यानंतर गुरुवारी त्यांची जेलमधून सुटका झाली होती. यावेळी जेलमधून बाहेर पडल्यानंतर रवी राणा हे हनुमान चालिसाचे पठण करताना दिसून आले होते.

नवनीत राणांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे भाजप नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. आता शुक्रवारी भाजप नेत्या चित्रा वाघ या नवनीत राणांच्या भेटीला पोहचल्या होत्या. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

खासदार नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली. एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकारने, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

दरम्यान, तुरुंगात राहून नवनीत राणा यांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला होता. तसेच स्पॉनडलायसिस आणि अंगदुखीचाही त्रास त्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर रवी राणाही त्यांच्या भेटीला पोहचले होते.

महत्वाच्या बातम्या-
‘खाजगीकरणाची खाज वाढायला लागली, अजून कुठे कुठे खाजवणार?’; उद्धव ठाकरेंचा केंद्राला खोचक सवाल
मुस्लिम कुटुंबाचे योगी प्रेम; राम मंदिराच्या उभारणीसाठी 90 लाखांची वैयक्तिक मालमत्ता देण्याची केली घोषणा
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now