चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा सोमवारी मोठा अपघात झाला आहे. त्या विमानात सुमारे १३३ लोक होते. अपघातानंतर तत्काळ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. आता या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यांना विमान अपघातापूर्वीचे व्हिडीओ सांगण्यात येत आहेत. (china plane crash viral video)
बोईंग ७३७ विमान टेंगशिअन काउंटीमधील वुझोउ शहरात कोसळले आहे. हे विमान डोंगराळ भागात कोसळल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या भागात आग लागली. १३३ प्रवासी आणि केबिन क्रू घेऊन हे विमान कुनमिंगहून ग्वांझूला जात होते. अशात अचानक या विमानाचे नियंत्रण सुटले आणि त्याचा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला होता. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत हे विमान हजारो मीटर उंचीवरून जमिनीवर आले. अपघातापूर्वी शेवटच्या वेळी विमानाची उंची सुमारे तीन हजार फूट नोंदवण्यात आली होती. या घटनेच्या व्हिडिओमध्ये विमान अपघातानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसत आहे.
https://twitter.com/TheLegateIN/status/1505820283734994947?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1505820283734994947%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fnews%2Fchina-eastern-airlines-plane-carrying-133-passengers-crashes-search-and-rescue-operation-on%2F
अशात दुसरा व्हिडिओ एका कारमधून रेकॉर्ड करण्यात आला आहे. ज्यामध्ये विमान रॉकेटप्रमाणे जमिनीकडे जाताना दिसत आहे.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, संपूर्ण विमान पर्वतांच्या मध्ये पडले आणि त्यानंतर त्या डोंगराळ भागात आग लागली आणि सर्व जंगल जळून खाक झाले आहे.
विमानातील प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी आहे, आतापर्यंत कोणाच्याही मृत्यूबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी विमान अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
https://twitter.com/ChinaAvReview/status/1505856305495351296
जिनपिंग म्हणाले की, विमान अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला असून अपघातानंतर तात्काळ बचाव कार्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात येत असून लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी विमान सेवा क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजस्थान हायकोर्टाने सलमानला दिला सर्वोच्च दिलासा, सलमानची बहिण अलवीराही मुंबईला परतली
‘बीफ खाणारा प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत ज्ञान देत आहे?’, होळीला ‘हा’ संदेश दिल्याने रोहित शर्मा ट्रोल
कोट्याधीश व्हायचंय? रोज करा फक्त २० रुपयांची बचत, आरामात व्हाल करोडपती