Share

‘हम साथ साथ है’ मधली चिमुरडी बनली सुपरमॉडेल; फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यात छोट्या पात्रांनी चित्रपटात जीव ओतला आहे. चित्रपट पूर्ण करण्यासोबतच या छोट्या स्टार्सनी प्रेक्षकांच्या हृदयातही आपले खास स्थान निर्माण केले आहे. वर्षांनंतरही लोक ना त्याचा चेहरा विसरले ना त्याचे पात्र, 21 वर्ष जुना चित्रपट ‘हम साथ-साथ है’ हा आजही लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.

या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजही या चित्रपटातील संवाद आणि कलाकार लक्षात राहतात. त्याचबरोबर या चित्रपटात लहान मुलांची भूमिका आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत, पण त्यात भूमिका साकारणाऱ्या छोट्या मुलांमध्ये आज खुप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्यातीलच एक पात्र म्हणजे झोया अफरोजचा संपूर्ण लुक आज बदलला आहे. सिनेमातील सर्वात लोकप्रिय चित्रपट हम साथ-साथ है मध्ये, झोया अफरोज नीलमच्या धाकट्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. ती आता मोठी झाली आहे. झोया अफरोजचे सध्याचे फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की ही तीच मुलगी आहे.

झोया अफरोज एक सुपरमॉडेल आणि अभिनेत्री आहे. झोयाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली होती. तुम्हाला सांगू इच्छितो की, झोया लखनऊची रहिवासी आहे. मिठीबाई कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले. झोयाने अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्येही भाग घेतला आहे. झोया पॉन्ड्स फेमिना मिस इंडियाची दुसरी रनर अप होती.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, झोयाने ‘हम साथ साथ हैं’ तसेच ‘कहो ना कहो’, ‘प्यार के तिया से’, ‘ये एक्सपोज’, ‘स्वीटी वेड्स एनआरआय’ सारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. जोयाने सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे.

झोया प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोणला आपला आदर्श मानते. वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून मोठ्या पडद्यावर दिसणारी झोया अफरोज नुकतीच हिमेश रेशमियाच्या एक्सपोज या चित्रपटात दिसली. हा चित्रपट 2014 साली आला होता.

महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now