gulabrao patil : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात नाराजीनाट्यास सुरुवात झाली आहे. अनेकदा शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर आलेली आपण पाहिली आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, आता तर शिंदे गटातील वाद अत्यंत विकोपाला गेल्याच पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाच्या आमदाराने थेट शिंदे गटाच्या मंत्र्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांमधील नाराजी आता 3 महिन्यानंतर बाहेर येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिंदे गटाचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्याच गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली. यामुळे शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.
पाटील यांनी मंजूरी दिल्यामुळे चिमणराव पाटील हे नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘राष्ट्रवादीचा आमदारच काय, पण कम्युनिस्ट पक्षाचा माणूस जरी माझ्याकडे आला तरीही मी त्याच्यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.
आता यावरूनच शिंदे गटात नवीन वादाला तोंड फुटले आहे. चिमनराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत गुलाबराव पाटील हे माझ्या विरोधातील राष्ट्रवादीच्या व्यक्तीला निधी देतात, त्यांच्या कार्यक्रमाला जातात, त्यांनी त्यांना निधी द्यायला नको, कार्यक्रमाला जायला नको असं मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
दरम्यान, स्वतः माध्यमांशी बोलत असतांना चिमनराव पाटील यांनी तक्रारीचे कारण सांगितले आहे. चिमनराव पाटील यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांनी निधी दिला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील वेळ देतात तो द्यायला नको अशी मागणी चिमणराव पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर