शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ‘ती’ कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल

सध्या राज्याच्या राजकारणात एका फोन कॉल तूफान चर्चा सुरू आहे. एका बंडखोर आमदारानेच शिंदे गटातील आमदाराला जबरदस्त निशाणा साधला आहे. या निमित्ताने आता शिंदे गटातील अंतर्गत खुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सध्या या व्हायरल कॉलची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना बंडखोर व शिंदे गटाचे पारोळा तालुक्यातील आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी बंडखोर आमदार आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे.

सत्तेत आल्यापासून आपल्याला शिवसेनेत नीट वागणूक मिळत नाही, आपल्याला निधी दिला जात नाही अशा कारणांमुळे शिवसेनेच्या बद्दल ४० आमदारांनी बंड पुकारलं होतं. या राजकीय घडामोडींमद्धे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. अशातच आता शिंदे गटातील आ. चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादाचा एक फोन कॉल व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये ते गुलाबराव पाटील यांनी आपल्याला शिवसेनेत त्रास दिला. मात्र आता तेच शिंदे गटात आल्याने आपल्या पदरात पुन्हा तेच आलंय.. अशी खंत आ. चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेत गुलाबराव पाटील यांच्यापासून त्रास आहे. आपण वरिष्ठ नेत्यांना सांगितलं मात्र, परंतु सगळ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांना मंत्री केले तरी ते तिकडून फुटन आले, ते शिंदे गटात येतील असे वाटत नव्हते. यांचे दहा जन्मही उद्धव साहेब यांचे उपकार फिटले नसते, असं म्हणत आ. चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, “गुलाबराव पाटलांनी शिवसेना वाढवून दिली नाही, जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील.” असा आरोप चिमणराव पाटलांनी यावेळी केला आहे. यावर अद्याप गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. गुलाबराव काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
२५ पैशांची जुनी नाणी रातोरात बदलू शकतात तुमचं भविष्य; १ मिनिटात होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं
‘घरात घुसून मारलं होतं ना..’; या बॉलिवूड दिग्दर्शकावर संतापली कंगना राणावत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु