आईवडिल आपल्या मुलाचे नाव काय ठेवतील हे सांगता येत नाही. कोणी आपल्या बाळाचं नाव देव-देवतांच्या नावावर ठेवतं, तर कोणी प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या नावावर आपल्या बाळाचे नाव ठेवतात. पण उस्मानाबादमधून एक अनोखेच प्रकरण समोर आले आहे. (child name pantpradhan in usmanabad)
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका दाम्पत्याने आपल्या बाळाचं नाव पंतप्रधान ठेवलं होतं. पण याच पंतप्रधान नावामुळे बाळाच्या वडिलांना तीन महिने मोठा संघर्ष करावा लागला आहे. पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यानं आरोग्य विभागानं संबधित नावानं जन्म दाखला जारी करण्यासाठी विलंब केला होता.
आता अखेर तीन महिन्यानंतर त्यांना पंतप्रधान नावाचा जन्म दाखला मिळाला आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने पंतप्रधानाच्या वडिलांकडे जन्मदाखला सुपूर्द केला आहे. पंतप्रधानच्या पालकांचे नाव दत्ता चौधरी आणि कविता चौधरी असे आहे. तीन महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांना दाखल मिळाल्यामुळे त्यांना खुप आनंद झाला आहे.
दत्ता चौधरी आणि कविता चौधरी हे उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहे. त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले होते. १९ जून २०२० मध्ये त्यांचा पहिला मुलगा जन्माला आला होता, तेव्हा त्यांनी त्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रपती नावाचा जन्म दाखला आणि आधार कार्डदेखील मिळाले होते.
त्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी दुसरा मुलगा झाला. यावेळी चौधरी दाम्पत्याने दुसऱ्या मुलाचं नाव पंतप्रधान ठेवण्याचं ठरवलं. त्यांनी त्याचे बारसे घालून त्याचं नामकरण केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मुलाचा जन्म दाखला मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडे अर्ज केला.
त्यावेळी पंतप्रधान नावाने मुलाला दाखला कसा द्यायचा? असा प्रश्न त्या अधिकाऱ्यांना पडला आहे. संविधानिक नाव असल्याचे सांगत त्यांनी मुलाचा जन्म दाखला अडवून ठेवला होता. पण सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांना जन्म दाखला मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
दारूच्या नशेत धुंद होती अभिनेत्री, पोलिसांना केली शिवीगाळ, चालत्या व्यक्तीवर चढवली गाडी
‘गळाभेट घेत-बिर्याणी खायला गेल्याने…,’ मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल