Share

वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?

वाई तालुक्यातील केंजळ येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने तणाव निर्माण झाला आहे. कारण विनापरवाना पुतळा बसविल्याने त्याठिकाणी पोलिस आणि महसूल प्रशासन दाखल झाले आहे. तसेच पोलिसानांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त केला आहे. (chhatrapati shivaji maharaj statue in wai)

पुतळा ग्रामस्थ व तिथल्या तरुणांनी काढून घ्यावा आणि परवानगी घेऊन बसवावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण पुतळा हटविण्यासाठी तिथले ग्रामस्थ आणि युवक तयार नाहीये. त्यामुळे गावातले वातावरण आणखी तापले आहे. काही गैरप्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्या पटांगणात शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी चबुतरा बांधून शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला होता. याबाबत माहिती मिळताच भुईज पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले. तसेच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवण्याची मागणी पोलिस आणि महसूल प्रशासन करत आहे. पण गावातील लोक हे पुतळा हटवण्यास तयार नाहीये. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही याप्रकरणी गावात दाखल झाले आहे.

पोलिस प्रशासन पुतळा हटवण्याच्या मागणीवर ठाम असून गावातील लोक त्याला विरोध करत आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि तिथल्या ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू आहे.

शुक्रवारी मध्यरात्री गावच्या भैरवनाथ मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला दर्शनी भागात बसविण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. तसेच ज्यांनी हा पुरळा बसवला आणि त्यांनी तो लवकरात लवकर हटवावा अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या होत्या. पण अजून कोणीच पुढाकार घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
राहूल बजाज आमच्यासाठी देव होते, त्यांनी लाखो कुटुंबे उभी केली म्हणत कामगार ढसाढसा रडले
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना
निकोलस पूरनला लाॅटरी! प्रचंड अपयशी होऊनही मालामाल, मिळवले ‘इतके’ कोटी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now