राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे हा वादाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध भाजप आणि मनसे असाही वाद पाहायला मिळत आहे. अशात भाजप नेते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. त्यानंतर सत्ताधारीही त्यांना उत्तर देताना दिसून येत आहे. (chhagan bhujbal criticize pravin darekar)
सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे राज्यात कधीच झाले नव्हते, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली होती. तसेच अलिकडच्या काळातील जर सर्व कृत्य पाहिली तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते, असे प्रविण दरेकरांनी म्हटले होते.
आता प्रविण दरेकरांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सरकार पाडण्याची फार घाई झाली आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी प्रविण दरेकरांना लगावला आहे.
तसेच सरकार पाडण्यासाठी कोणावर ईडीचे प्रयोग कर, कोणावर सीबीआयचे प्रयोग कर हे सगळे चालू आहे. त्यातून राज्यात मारामाऱ्या सुरु आहे. दंगे सुरु आहे. सरकार अस्तित्वात नाही, असे चित्र त्यांना उभे करायचे आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भाजपचे लोक सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे त्यांचे प्रयत्न सफल होणार नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. तुम्हाला पूजा अर्चा करायची तर तुमच्या घरात करा किंवा मंदिरात करा. तुमच्या अमरावतीला मंदिर आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आता नाकातोंडात पाणी जात आहे. सत्ता येत असते जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नसल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. हे वेळीच नाही थांबले तर एका बाजूने हल्ला तर दुसऱ्या बाजूने प्रतिहल्ला होईल, असेही प्रविण दरेकरांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?