भारताच्या न्यायव्यवस्थेत काही वेळा वर्षे जातात पण एकदिवशी न्याय नक्की मिळतो. याची अनेक उदाहरणे सुद्धा आहेत. आता असाच एक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. जिथे एका तरुणाने जीव गमावला होता, आता त्याच्या कुटुंबाला सहा वर्षानंतर न्याय मिळाला आहे. (chetan family get 43 lakhs)
ही गोष्ट २०१६ सालची आहे. मुंबईत राहणारा २६ वर्षीय चेतन आचिर्णेकर याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ऑटोरिक्षाचे २८ रुपये भाडे शिल्लक असल्याने हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेला तब्बल सहा वर्षे झाले. आता इतक्या वर्षानंतर त्याला न्याय मिळाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना ४३ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. २८ रुपयांवरून सुरू झालेला वाद ४३ लाख रुपयांपर्यंत कसा पोहोचला हेच आता आपण जाणून घेणार आहोत.
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, २३ जुलै २०१६ रोजी दुपारीच्या सुमारास चेतन विक्रोळी पूर्व येथील विमानतळावरून रिक्षाने घरी आला. येथे आल्यावर चालकाला २०० रुपये देण्यात आले. यानंतर चालकाने आपल्याकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत उर्वरित पैसे देण्यास नकार देत वाहन सुरू केले.
चेतनने चालकाला थांबण्यास सांगितले, मात्र चालकाने थांबण्याऐवजी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेतनच्या अंगावर वाहन उलटले आणि तो जबर जखमी झाला. विशेष म्हणजे तरुणाचे वडील या संपूर्ण घटनेचे साक्षीदार ठरले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की चेतनचा मृत्यू अपघातात झालेल्या जखमांमुळे झाला आहे. ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावरून स्पष्टपणे दिसून येते की ऑटोरिक्षा चालक या अपघाताला जबाबदार आहे, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
आता नुकसानभरपाईची रक्कम चेतनच्या कुटुंबातील सदस्य गणपत आणि स्नेहा आचिर्णेकर आणि लहान भाऊ ओंकार आचिर्णेकर यांना देण्यात येणार आहे. विमा कंपनी आणि ऑटोरिक्षा मालक कमलेश मिश्रा ही रक्कम संयुक्तपणे भरणार आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाईची रक्कम मोजताना मृत्यूसमयी तरुणाच्या १५ हजार रुपयांच्या पगाराचाही विचार करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्याकडून साईचरणी ५ हजार किलो केशर आंब्याचे दान, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
हॉटेलचे पैसे न दिल्यामुळे सदाभाऊ खोतांवर भडकले अमोल मिटकरी; म्हणाले, पोट फुटेपर्यंत…
“सदाभाऊ खोत फसवा माणूस, माझ्यावर गुन्हा दाखल करायचाय तर करा पण माझे थकलेले बिल द्या”