Share

छत्रपती शिवाजी महाराजांकडे ७ घोडे होते, त्यांची नावे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या..

आज १९ फ्रेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती. रयतेचा राजा, जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (chatrapati shivaji maharaj) जयंती महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहाने साजरी करतात. (chatrapatil shivaji maharaj has 7 horses )

शिवाजी महाराजांचा स्वभाव, त्यांची धाडसी वृत्ती, महिलांबद्दलचा आदर, दूरदृष्टी आणि करारीपणा अशा अनेक गोष्टी महाराजांकडून घेण्यासारख्या आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी तरूणांना प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. शिवाजी महाराजांचे आयुष्य खुप संघर्षमयी होते. आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण जगात शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. अनेक तज्ञ शिवाजी महाराजांचा अभ्सास करण्यासाठी भारतात येतात. तुम्हाल कदाचित माहित नसेल पण शिवाजी महाराजांची जयंती १११ पेक्षा जास्त देशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

शिवाजी महाराजांकडे अनेक जातींचे घोडे होते. वेगवेगळ्या प्रसंगानुसार ते त्या घोड्यांचा वापर करत असत. शिवाजी महाराजांकडे कृष्णा, रणभीर, गाजर, इंद्रायणी, तुरंगी, मोती, विश्वास असे सात घोडे होते. त्यांच्याकडे पांढरा घोडा होता त्याचे नाव कृष्णा होते.

या घोड्यावर ते राज्यभिषेकानंतर बसले होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांच्या अधिपथ्याखाली ४०० गड होते. काही गडांची स्थापना त्यांनी स्वत: केली होती आणि काही गड त्यांनी युद्ध करून जिंकले होते. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. म्हणजे त्यांच्या मंडळात ८ मंत्री होते.

३० विभागांचे काम त्यांच्यात वाटण्यात आले होते. या ३० विभागातील कामकाज पाहण्यासाठी ६०० कर्मचारी नेमण्यात आले होते. महाराजांसमोर जो पण समस्या घेऊन यायचा त्याचा तिथेच समोरासमोर निकाल लावला जायचा.

रायगडावर कोणत्याही कामासाठी आलेला व्यक्ती भोजन केल्याशिवाय जात नसे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शिवाजी महाराजांकडून आजच्या पिढीने आत्मसात केल्या पाहिजेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
‘या’ नियमाचे उल्लंघन केल्यास शिवाजी महाराज स्वता:च्याच मावळ्यांना द्यायचे शिक्षा
महाकाल मंदिरात बुरखा घालून महिलेनं घेतलं दर्शन, मंदिर प्रशासनाने रोखताच म्हणाली..
बेव सिरीजच्या नावाखाली बटल्यांनी मॉडेलसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य; मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
माकडांचा धुमाकूळ! ईव्हीएम कंट्रोल रुम परिसरातील ३४ सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, अधिकाऱ्यांना बसला धक्का

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now