आयपीएल लिलाव २०२२ मध्ये ह्यू अॅडम्सचा लिलावकर्ता म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु काही खेळाडूंच्या लिलावानंतरच तो बेशुद्ध पडला. यानंतर चारू शर्मा यांना घाईघाईने बोलावण्यात आले आणि त्यांच्याकडून उर्वरित खेळाडूंचा लिलाव करून घेतला. (charu sharma mistake in ipl auction)
चारू शर्मा हे लिलावासाठी अजिबात तयार नव्हता आणि त्यामुळे त्यांची चूक करण्याची शक्यता खूप जास्त होती. आता लिलावादरम्यानही असाच काही प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चारू यांनी खलील अहमदला दिल्ली कॅपिटल्सला ५.२५ कोटींना विकले, तर या किमतींत तो मुंबई संघात जायला हवा होता.
चारु शर्मा यांच्या या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चारु शर्मा यांच्या या चुकीमुळे मुंबई इंडियन्सला फटका बसल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला विकत घेण्यासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात शर्यत सुरू होती. मुंबई इंडियन्सने खलीलवर ५.२५ कोटींची बोली लावली होती. यानंतर चारू यांनी दिल्लीला विचारले की तुम्हाला ५.५० कोटींची बोली लावायची आहे का?
दिल्लीच्या किरण कुमार गांधी यांनी प्रथम बोली लावण्यासाठी पॅडल उचलले, पण पटकन खाली केले. इथेच चारू विसरतात की मुंबईने खलीलवर किती बोली लावली होती. इथून त्यांनी खलीलवर दिल्लीने ५.२५ कोटींची बोली लावल्याचे बोलायला सुरुवात केली.
आता त्यांनी मुंबईला विचारले की त्यांना खलीलवर ५.५० कोटींची बोली लावायची आहे का? मुंबईने तसे करण्यास नकार दिला आणि खलील अहमद ५.२५ कोटींना दिल्ली संघात सामील झाला, तर मुंबईने त्याला या किमतीत विकत घेण्याची बोली लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ कुख्यात गॅंगस्टरच्या पत्नीने केला राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
चीनची ‘ही’ फसवेगिरी समोर आल्यानंतर भारताने पुन्हा ५४ चायनीज ऍप्सवर घातली बंदी
छाती ठोकून शब्द दिला; दंड, मांड्या थोपटत आश्वासन पूर्ण केलं; अमोल कोल्हेंची पोस्ट तुफान व्हायरल