Share

निवडणूक आयोगाने शिंदे गटावर कारवाई केली तर..; अखेर बावनकुळेंनी सांगितला भाजपचा प्लॅन बी

devendra fadanvis eknath shinde

सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पक्षप्रमुख पदावरुन वाद सुरु आहे. याबाबत शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुद्धा झाली.  या सुनावणीनंतर अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहे. आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, शिंदेंच्या १६ आमदारांवर जरी कारवाई तरी आम्ही आमचे बहुमत सिद्ध करुन दाखवू, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.

विरोधी पक्षातील काही आमदार हे भाजपमध्ये यायला तयार आहे. ते भाजपमध्ये येऊ नये म्हणून सरकार पडणार असे म्हटले जात आहे. पण जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आमच्याकडे १८४ आमदारांचा पाठिंबा असेल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दुध पिणारे आहेत. विकास त्यांच्या रक्तातच नाहीये. त्यामुळे त्याविषयावर बोलून काही फायदा नाहीये, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ३० जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला आहे.

दोन तृतीयांश नेते एकाचवेळी बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात सामील झाले तर ते वाचतात नाहीतर ते अपात्र ठरतात. पण सुरवातीला शिवसेनेतून बाहेर पडलेले १६ आमदार हे दोन तृतीयांश नव्हते. तसेच ते दुसऱ्या पक्षातही सामील झाले नाही, त्यामुळे ते अपात्र ठरण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री म्हणून शिंदे आहेत पण पक्षप्रमुखपदी कोण हवेत? शिंदेगटातील बड्या नेत्याने दिले ‘हे’ उत्तर
‘मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोबत…’; कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
राम सीतेसोबत बसून दारू प्यायचा, तो आदर्शवादी कसा? ‘या’ प्रसिद्ध लेखकाने ओकली गरळ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now