Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. यामुळे शिवसेनेचे शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले. त्यामुळे आता शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? यावरून दोन्ही गटात वाद चालू आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने देखीक याबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. यामुळे शिवसेना व पक्षचिन्हाबाबतचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. याची उत्तरे लवकरच मिळतील
परंतु, याआधीच ठाकरे व शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. शिवसेना आपलीच असणार. तसेच पक्षचिन्ह देखील आपल्यालाच मिळणार असे दोन्ही गटाकडून सांगितले जात आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच न्हवे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून सुद्धा एकनाथ शिंदेच हवेत. असे ते म्हणाले आहेत.
सेलू येथील शिंदे गटाचे नेते हरिभाऊ लहाने यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्यांच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार संतोष बांगर उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ” पक्षप्रमुखांच्या निवडीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निश्चित आवडतील.”
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार काल ( दि.21) जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान हिंगोली दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना धनुष्यबाण कोणाचा ? असा प्रश्न विचारताच सत्तार यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे पाहत ‘साहेबांचा’ असे उत्तर दिले.
दरम्यान ते म्हणाले की, ” एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवणारा प्रत्येक शिवसैनिक हा आतापासून पेटून उठलाय. त्यामुळे यावेळी आमचे आमदार आधीपेक्षा जास्त लीडने निवडून येतील. यात काही शंका नाही. आधीच्या निवडणुकीत आम्ही ज्यांचे फोटो लावले होते. त्यांच्या सोबतच आम्ही गेलो आहे. ”
याशिवाय शिंदे गटासोबत सध्या 13 खासदार 40 आमदार आहेत. या आमदार खासदारांना मिळालेली मते अधिकृत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच असणार आहे. शेवटी न्यायालय जो निर्णय देईल तोच अंतिम राहील. असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ज्याने आजवर गाडीतून पेशंटला नेत शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचवले त्याचाच अपघातात मृत्यू
- मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोबत कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
- कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेने केला भाजप अन् शिंदेसेनेचा सुपडा साफ; उद्धवजींनी थेट मातोश्रीवर बोलावत…