शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.
यामुळे शिंदे गटातील या १६ बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील या प्रकरणावर खंडपीठ स्थापन केले जाईल. त्यानंतर सुनावणी केली जाईल. तोपर्यंत १६ आमदारांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. तसेच या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
याचाच धागा पकडत भाजपाचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शिवसेनेला एक आवाहन केलं आहे. ‘शिवसेनेने बहुमताचा आदर करावा, जर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्यात,’ असे आवाहन त्यांनी केलं आहे.
याबाबत बोलताना बावनकुळे यांनी म्हंटलं आहे की, ‘ज्या दिवशी विधान सभेत अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरावात १६४ मतं मिळाली; त्याच दिवशी शिवसेनेने सर्व याचिका मागे घ्यायला हव्या होत्या. इतकं मोठे बहुमत मिळाल्यामुळेच चिडून ते केसेस करत आहेत.’
मात्र मला असं वाटत की, १६४ मत मोजली गेली हे सुप्रीम कोर्टाला कोर्टालाही समजलं आहे. यामुळे माझी शिवसेनेला विनंती आहे, की सर्व याचिका मागे घ्याव्या आणि जनादेशाचा आदर करावा,” असे बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या विनंतीला अद्याप सेनेकडून प्रत्युत्तर आलेलं नाहीये.
वाचा आज कोर्टात नेमकं काय घडलं..?
शिवसेनेकडून कपिल सिबल यांनी बाजू मांडली. त्यावेळी महाराष्ट्रातील या प्रकरणाबाबत लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरन्यायाधीशांना केली. होती परंतु ही मागणी फेटाळण्यात आली.
परिशिष्ट १० मधील तरतुदीनुसार, शिवसेना पक्षातून फुटलेल्या शिंदे गटाने इतर पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे, तसेच त्या आमदारांच्या पाठिंब्याने स्थापन झालेले सरकार नियमबाह्य ठरवावे. या मुख्य मागणीसह अपात्रतेच्या कारवाई संदर्भात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?