काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. भाजप नेते नाना पटोले यांच्यावर संतापले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. नाना पटोलेंविरोधात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले आहे.
या आंदोलनादरम्यान नाना पटोले यांची प्रतिमा जाळण्यात आली. हा वाद वाढतच चालला होता. त्यानंतर पोलिसांनी अतुल भातखळकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आता हे प्रकरण जास्तच तापताना दिसत आहे. आंदोलनावेळी भाजप कार्यकर्ते येडा नानाला अटक करा अशा घोषणा देत होते.
जेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तेव्हा अतुल भातखळकर म्हणाले की, कारवाई आमच्यावर कसली करता वाट्टेल ते बरळणाऱ्या येडा नानावर कारवाई झाली पाहिजे. पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसच्या येडा नानाचा पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनी जाळला. त्याआधी भरपूर जोडेही मारण्यात आले.
या कारणांमुळे पोलिसांनी आम्हाला अटक केली. हा गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही शंभरवेळा करू असा इशाराही अतुल भातखळकर यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत हे वक्तव्य केले आहे. भातखळकरांनी ट्विटरवर एक व्हिडीओही शेअर केला आहे ज्यामध्ये पोलिस त्यांना घेऊन जात आहेत.
नाना पटोलेंविरोधात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठिय्या आंदोलन केले होते. कोराडी पोलिस ठाण्याच्या परिसरात पटोले यांच्याविरोधात त्यांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. त्यानंतर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नाना पटोलेंविरोधात भाजप नेते आक्रमक होताना दिसत आहेत.
नाना पटोलेंनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले होते. ते म्हणाले होते की, “माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो”, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
यापूर्वी देखील नाना पटोले अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर वक्तव्ये करून त्यांनी ठाकरे सरकारच्या अडचणी अनेक वेळा वाढवल्या आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चालले नसल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
ढिचँक पुजाचं नवीन गाणं ‘I Am A Biker’ रिलीज, गाणं पाहून नेटकरी म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’
VIDEO: गणेश आचार्यचा Oo Aantava गाण्यावरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन-समंथाला फुटले हसू
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! मकरसंक्रातीला घरी आलेल्या मुलीसोबत बापाने केले ‘हे’ भयानक कृत्य
‘या’ बिजनेसला सुरू करण्यासाठी मिळणार ८५ टक्के सबसिडी, ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा होणार नफा