Share

चंद्रमुखी’ने आपल्या सौंदर्य अन् लावणीने प्रेक्षकांना घातली भुरळ; दोनच दिवसात कमावले तब्बल …

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक’चा चंद्रमुखी हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिका साकारत असल्याने सध्या ती ‘चंद्रमुखी’ याच नावाने सर्वत्र चर्चेत येत आहे. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.

सध्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘बाई गं..’ ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असुन आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे. इतकंच नाही तर या लावणीचं नृत्यदिग्दर्शन ‘लावणीकिंग’ म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी केलं आहे.

आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती ‘चंद्रा’ हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे चंदमुखीचा लव्ह ट्रँगल …..
एक ध्येयवेडा विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे यांचा उलगडा करणारा चित्रपट म्हणजे चंद्रमुखी. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा लव्ह ट्रँगल पुढे कोणत्या वळणावर जातो, हे चित्रपट पाहुनच समजते.

तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. चंद्रमुखी हा चित्रपट अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असुन, या चित्रपटाने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असुन, फक्त दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. नुकतीच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा ही उत्तम प्रतिसाद मिळत असुन  हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरत आहे. तसेच जागतिक पातळीवरदेखील हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
आता कॉलेजमध्ये मिळणार पोर्नोग्राफीचे धडे, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र पॉर्न फिल्म बघणार
‘धुमधडाका’, ‘दे दणादण’ चित्रपटातील लक्ष्याच्या हिरोईनचे निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
चहा, नाश्ता आणि पाचशे रुपये देऊन मनसेच्या सभेला माणसं; चंद्रकांत खैरेंचा दावा   

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now