Share

MNS : मनसेला युती करायची असेल, तर…; चंद्रकांत पाटलांनी सांगितले मनसेला नक्की काय करावं लागले?

chandrakat patil talk about mns  | लवकरच राज्यात महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा महापालिकेच्या निवडणूकांवरही परिणाम होणार आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे, एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेंची शिवसेना.

आता भाजप आणि शिंदे यांची महापालिकेत युती होणार हे निश्चित आहे. पण मनसेची सुद्धा भाजपसोबत युती होणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते.

ते तिघेही एकत्र आल्यामुळे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप-शिंदे गटासोबत मनसेची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.

आता मनसेच्या युतीबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसून तशी चर्चाही झालेली नाही. युती करायची असेल, तर भाजपच्या कोअर कमिटीसमोर त्याचा प्रस्ताव यावा लागतो. १३ जणांची कमिटी आहे ती याबाबत निर्णय घेत असते. त्यामुळे याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, मनसेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत चांगलीच चर्चा झाली होती. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, आमच्या या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की, राज ठाकरे यांच्याशी आम्ही दिवाळीनिमित्त असलेल्या कार्यक्रमात भेटलो होतो. राज ठाकरेंनीच मला आणि देवेंद्र फडणवीसांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आम्ही भेटलो होतो. त्यामुळे यावेळी राजकीय चर्चा झाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-
Shampoo : धक्कादायक! ‘या’ शॅम्पूमुळे वाढतोय ब्लड कॅन्सरचा धोका, कंपनीने प्रोडक्ट्स मागवले परत
uddhav thackeray : दिवाळीच्या मुहूर्तावर राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाने दिल्या ठाकरे गटाला शुभेच्छा, अन्..
IND Vs PAK : भारताला चीटर म्हणणाऱ्या पाकिस्तानची ICC ने केली बोलती बंद, थेट दिला ‘त्या’ ३ धावांचा पुरावा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now