देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray)
याचाच धागा पकडत भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, इंडिया टुडेनं प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी याबद्दल विचारणा केली आहे. ४३ टक्क्यांहून अधिक मत मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा समावेश आहे. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
नवीन पटनायक यांच्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आहे. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे नाव आहे. त्यांची कामगिरी ६७.५ लोकांना आवडली आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्या कामावर ६१.८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. केरळचे मुख्यमंत्री या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांची कामगिरी ६१.६ टक्के लोकांना आवडली आहे.
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री या यादीत सहाव्या स्थानी असून त्यांचे काम ५७.९ टक्के लोकांना आवडले आहे. तसेच ९ मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये फक्त एकच भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे. त्यांचे नाव हेमंत विश्व शर्मा असे असून ते आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कामगिरीवर ५६.६ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केली आहे. आठव्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल ५१.४ टक्क्यांसह आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ४४.९ टक्क्यांसह यादीत नवव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ज्या नवरा-बायकोसाठी फडणवीसांनी पर्रिकरांना डावललं, तेच आता पक्के अडकले; भाजपवर नामुष्की
अफेअरच्या संशयावरुन झाला २० वर्षांचा संसार उध्वस्त; महिलेने पतीचे शीर कापून गाठले पोलिस स्टेशन
फौजी पित्याने मुलीच्या बलात्काराचा घेतला बदला, भर कोर्टातच आरोपीला घातल्या गोळ्या
‘या’ कारणामुळे नूतनने संजीव कुमार यांना भर शुटींगमध्ये दिली होती कानशिलात, वाचा किस्सा