कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधले राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन झाले.
जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत कॉंग्रेसने ट्वीट करत माहिती दिली आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
“झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते २४ तास देखील झोपणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील यांनी केलेल्या या विधानावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावेळी बोलताना पाटील यांनी निवडणुकीबाबत देखील भाष्य केले आहे.
याचबरोबर यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला. कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ‘यापूर्वी दोनवेळा देशात हिंदूंचं वर्चस्व झालं होतं. पृथ्वीराज चौहान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता नरेंद्र मोदींच्या काळात हिंदूंचे वर्चस्व होत आहे. याचा अर्थ मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
इतक्या वर्षांनंतर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, मारेकऱ्यांना साक्षीदाराने ओळखलं
‘आप’ की सरकार, काम की सरकार! 4 दिवसात घेतले 4 धडाकेबाज निर्णय; घ्या जाणून..
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची क्रेझ कायम, पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’ने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप