Share

“भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे”

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. आज या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या पाचही राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजपनेच बाजी मारली आहे. (chandrakant patil on up election)

आंध्र प्रदेश जगनमोहन रेड्डी, पं बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, यांसारख्या नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे अरविंद केजरीवाल. आम आदमी पक्षाने पंजाबच्या निवडणूकीत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. पण इतर राज्यात भाजपने बाजी मारल्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

देशातील मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात असलेल्या ५ राज्यांच्या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली दिसून आली आहे. तसेच भाजप पुन्हा एकदा वरचढ ठरताना दिसून येत आहे. तर काँग्रेसचा दारुन पराभव केला आहे. या निकालानंतर देशभरातल्या भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा विजय मिळवल्याचे दिसून येत आहे. या पाच राज्यांच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. भाजपला पराभूत करणं म्हणजे भितीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

एक परिपक्व राजकीय नेता म्हणून मी निकालावर मत मांडणं योग्य नाही. पण सध्याचे जे चित्र दिसत आहे, त्यावरुन ५ पैकी ४ राज्यांत भाजपच विजयी होईल. युपीत सर्व महिलांनी भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला केलं असेल. भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या चार तासातचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. भाजपने ४०३ पैकी २५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली. त्यानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव
नवज्योतसिंग सिद्धूंसारख्या दिग्गज नेत्याला हरवणाऱ्या ‘पॅड वूमन’ जीवन ज्योत कौर कोण आहेत?
“मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं”

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now