राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (chandrakant patil on devendra fadanvis)
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.
भाजपच्या तीनही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विजयानंतर भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीला. मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली! सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय @Dev_Fadnavisजींच्या रणनीतीला. मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! pic.twitter.com/yPXA4iedsG— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022
तसेच ‘माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला’ ही शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे… आमचे देवेंद्र फडणवीस जी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
'माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला' ही @PawarSpeaks यांची प्रतिक्रिया बोलकी आहे… आमचे @Dev_Fadnavisजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे. @BJP4Maharashtra
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022
दरम्यान, मत अवैध ठरवण्याच्या वादावरुन शुक्रवारी खुप गदारोळ झाला होता. याचा परीणाम निवडणूकीच्या निकालावरही पाहायला मिळाला. निवडणूकीचा निकाल रात्री साडेतीन वाजता लावण्यात आला. ज्यामध्ये भाजपच्या तीनही उमेदवारांची राज्यसभेवर वर्णी लागली.
महत्वाच्या बातम्या-
‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला
महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..
क्रीडामंत्र्यांनी रणजी ट्रॉफीत घातला धुमाकूळ, वयाच्या ३६ व्या वर्षी ठोकले शतक, रचला इतिहास