राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.
तर सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भावना अनावर झाल्या. विशेष बाब म्हणजे काल चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांना महाडिकांच्या विजयाचे गिफ्ट मिळाले.
याचबरोबर महाडिकांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना चंद्रकांतदादांना कोल्हापुरी पैलवान गिफ्ट केल्याचे सांगितले आहे. खरं तर महाडिकांचा विजय भाजपसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचे कारण असे की, महाडिकांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला कोल्हापुरातून हद्दपार व्हावे लागले आहे.
यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गुर्मी उतरवली असं बोलणे आमच्या संस्कृतीमध्ये नाही, मात्र मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे हे आता ठाकरे सरकारमधील नेत्यांना कळेल. फडणवीस यांच्या उत्तम नियोजनातून हा विजय झाला आहे.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
विजयानंतर महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला म्हणाले, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यामागे शिल्पकार जर कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्यामुळे विजय मिळाला आहे. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले.
पुढे बोलताना ते म्हणाले, कोणतीही निवडणूक असली की टेन्शन हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना असतं. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या दोघांच्या रणनितीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले, असे धनंजय महाडिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
सत्ताधाऱ्यांना धूळ चारणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
शाहरूखने अखेर सोडले मौन, NCB वर गंभीर आरोप करत म्हणाला, आम्हाला राक्षसासारखे…
उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य
ब्रालेस ड्रेस परिधान करून रस्त्यावर फिरताना दिसली ‘ही’ अभिनेत्री, फोटो पाहून चाहते घायाळ