Share

संभाजीराजेंचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून दाखवावं, मग कळेल कुणी खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

संभाजीराजे यांनी आपण राज्यसभा निवडणूकीची सहावी जागा अपक्ष लढवणार असे स्पष्ट केले होते. शिवसेना संभाजीराजेंना राज्यसभेजी उमेदवारी देईल अशी चर्चा होती, पण शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात होते. (chandrakant patil criticize uddhav thackeray)

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिलेला शब्द मोडला अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी निवडणूकीत माघारही घेतली आहे.

संभाजीराजेंच्या आरोपानंतर आता भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक फेसबूक पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला महाराजांच्या वशांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात शिव वापरायचा नैतिक अधिकारही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/100044536083059/posts/pfbid02HA5omAMWqopJcRqF3woWWZY883qSL2iFxcACxveZArHBaB2Guo8Wf1bRRQTxF9Rfl/?d=n

राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं? असे चंद्रकांत पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरे जींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव, असेही चंद्रकांत पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेबाबत आमच्यात चर्चा झाली होती. सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now