कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधले राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा ही गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. आज शक्ती प्रदर्शन करत सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात पोहोचले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष केले. ‘उत्तर’ची जागा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. दुर्देवाने शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध रहावे, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना पाटील यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढवला. याबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसची ५० वर्षे सत्ता असून देखील कोल्हापूरला विकासापासून काँग्रेसने वंचित ठेवले. तर पाच वर्षात भाजपाने जिल्ह्याचा विकास केला. यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने मतदार जमले असून हे सत्यजित कदम यांच्या विजयाचे चिन्ह असल्याचे मत पाटील त्यांनी व्यक्त केले.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट काँग्रेसलाच ऑफर दिली आहे. पाटील यांच्या विधनाने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो’ अशी थेट ऑफरच चंद्रकांत पाटलांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
३७० कलम हटवल्यामुळे काश्मीरची लेक झाली महाराष्ट्राची सून; भारतीय जवानाची लव्हस्टोरी चर्चेत
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रेमात राजकारण आलं अन् सगळंच उध्वस्त झालं; बायकोने आमदार नवऱ्याकडे मागितला घटस्फोट
पैसा कमवण्यासाठी दुखापत झालेले खेळाडू देखील IPL वेळी फिट होतात; रवी शास्त्रींचा थेट निशाणा