Share

कार्यकर्त्यांनो..! ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवा; आक्रमक झालेल्या पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश

patil

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्लानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमय्या गृहसचिवांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीला गेले होते. सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे.

किरीट सोमय्या राणा दांपत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्थानकात गेले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी असलेल्या शिवसैनिकांमध्ये महाडेश्वरही सामील होते. तर महाडेश्वर यांनी उलट आरोप करत म्हंटले की, सोमय्या यांनीच पहिले शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप महाडेश्वर यांनी केला होता.

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचा सल्ला दिला आहे. ते याबाबत पुण्यात बोलत होते.

पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल तर प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे, असं पाटील म्हणाले. याचबरोबर सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर पुण्यात किमान दोनशे निदर्शने व्हायला हवी होती, प्रत्यक्षात किती झाली? असा सवाल यावेळी बोलताना पाटील यांनी उपस्थित केला.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले, पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल, तर आपल्यालाही ‘रिअॅक्ट’ व्हावे लागेल. ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल, असा सल्लाच चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण आणखीच तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सोमवारी (काल) भारतीय जनता पक्षातर्फे पुणे महानगरपालिका कार्य अहवालाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, संघटक सरचिटणीस राजेश पांडे इ. उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 
क्राईम इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now