chandrakant patil angry on nana patole | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अशातच पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. समता सैनिक मनोज गरबडे याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण आणखी तापले आहे. आता या सर्व प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांना धारेवर धरले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नाना पटोल्या हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना दिले आहे.
मी कुणालाही घाबरत नाही. भ्याड हल्ले का करतात? हिंमत असेल तर समोर या, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच दिलगिरी व्यक्त करुनही अशी शाईफेक केली जात आहे, हे चुकीचे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटलांना भीक, लोकवर्गणी आणि देणगी यातील फरक कळतो का? असा सवाल नाना पटोले यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोल्या हिंमत असले तर माझ्यासमोर ये आणि चर्चा कर. बुद्धी इतकी भ्रष्ट नको होऊ देऊ. नाना पटोले माझे चांगले मित्र आहे, पण त्यांनी अशी टीका करणं योग्य नाही.
महत्वाच्या बातम्या-
“हा तर रोहीतचाही बाप निघाला”, इशानच्या झंझावाती द्विशतकानंतर चाहत्यांनी केले तुफान कौतुक; वाचा भन्नाट प्रतिक्रीया
मी त्रिशतकही केले असते पण..; द्विशतकानंतर गर्वाने फुगला इशान किशन, ‘या’ खेळाडूला दिले क्रेडीट
vasant more : मी स्मशानभूमीत जाईल, पण मनसेच्या कार्यालयात जाणार नाही; वसंत मोरे संतापले