Share

‘शिवसेनेनं सोमय्यांना ठार मारण्याचा प्लॅन आखला होता’, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

आज पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (kirit sommaya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवाजीनगर  पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. (chandrakant patil alligations on shivsena after attack on kirit sommaya)

त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच सोमय्या यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही झाला. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या पायरीवर पडले. जेव्हा ते पडले तेव्हा त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या घटनेवर अनेक भाजप नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही या घटनेचा निषेध करत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की, व्हिडीओवरून असं दिसतंय की हा सोमय्या यांच्यावरील सुनियोजित प्राणघातक हल्ला होता. सोमय्यांना ठार मारण्याचाच सेनेचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप त्यांनी लावला आहे.

सध्या किरीट सोमय्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले.

ते म्हणाले की, किरीट सोमय्यांवर हा भ्याड हल्ला होता. या व्हिडीओवरून असं दिसतंय की हा सोमय्या यांच्यावरील सुनियोजित प्राणघातक हल्ला होता. सोमय्यांना ठार मारण्याचा सेनेचा प्लॅन होता. किंबहुना शिवसेनेनं आज सोमय्या यांना ठार मारण्याचाच प्लॅन होता असं या हल्ल्याच्या क्लिपींग वरून दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसैनिकांवर ३०७ आणि ३२६ कलमानुसार गुन्हा दाखल करावा अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही हे सर्व पुरावे कोर्टात दाखल करू जर पोलिसांनी सु मोटो गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता किरीट सोमय्या यांची प्रकृती ठीक आहे ते आता या धक्क्यातून सावरले असून नक्कीच नव्या जोमाने कामाला लागतील, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
“गुंडागर्दी खपवून घेणार नाही”; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीनंतर फडणवीस संतापले 
आरं तू माणूस हाय का सैतान! १३ फूट मगरीची शिकार करून खाल्ल तिचं ४०० किलो मांस
कोरेगाव भीमा प्रकरणी आता विश्वास नांगरे पाटलांची होणार चौकशी; परमबीर सिंग, रश्मी शुक्लानंतर पाटलांची बारी
कोरेगाव भीमा प्रकरणी आता विश्वास नांगरे पाटलांची होणार चौकशी; परमबीर सिंग, रश्मी शुक्लानंतर पाटलांची बारी

राजकारण

Join WhatsApp

Join Now