राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चहलच्या फिरकीसमोर आरसीबीचे खेळाडू हतबल झाले होते. चहलने त्याच्या जुन्या फ्रेंचायजीच्या विरोधात जबरदस्त गोलंदाजी केली.
चहलने केवळ महत्वाच्या प्रसंगी विकेट घेतल्या नाहीत तर आरसीबीचा रनरेटही नियंत्रणात ठेवला. चहलच्या कामगिरीचा त्याची पत्नी धनश्री वर्मानेही मनापासून आनंद घेतला. चहलने चार षटकात अवघ्या 15 धावा देत दोन बळी घेतले. आपल्या पहिल्याच षटकात चहलने बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पुढच्याच षटकात डेव्हिड विलीलाही बाद केले. यासह चहलने विराट कोहलीलाही धावबाद करण्यातही आपली महत्वाची भूमिका बजावली. चहलने डेव्हिड विलीला बोल्ड करताच स्टँडवर उपस्थित त्याची पत्नी धनश्री आनंदाने उड्या मारू लागली. तिच्या या भावनिक प्रतिक्रियेने सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चहलच्या गोलंदाजीचा राजस्थानला काहीच फायदा झाला नाही. राजस्थान संघाला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने बंगळुरूसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्सने हे लक्ष्य सहज पार केले.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये सलग दोन सामने जिंकले असून या मोसमात त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानमधील दोन खेळाडू म्हणजे प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन चांगलेच महागात पडले. कृष्णाने चार षटकांत ४० आणि अश्विनने ३९ धावा दिल्या.
या दोन्ही गोलंदाजांना यश मिळवता आले नाही त्यामुळे त्यांच्यावर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा सामना जरी राजस्थानला गमावला असला तरी चहलच्या पत्नीचा म्हणजे धनश्रीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. धनश्रीचे चहलवरचे प्रेम पाहून अनेकांनी दोघांचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/swadeshLokmat/status/1511388032506953734?s=20&t=Dv4TdICooxf28KDNaGZRAQ
महत्वाच्या बातम्या
“विविध राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदी भाषेत बोलावे”; अमित शहांचे आवाहन
…तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल, अमेरीकेची भारताला जाहीर धमकी; जाणून घ्या कारण
Prajakta Mali Photo : प्राजक्ताची गुलाबी अदा पाहून चाहते झाले फिदा; म्हणाले, परत एकदा पडलो तुझ्या प्रेमात
‘राऊतांनी माझ्याकडून २५ लाख उकळले, मी पुरावे द्यायला तयार’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ