Share

अनोळखी मुलीला चहलने केला ‘असा’ मेसेज, मुलीने ऍक्शन घेताच मागावी लागली माफी, वाचा सविस्तर..

IPL 2022 मध्ये पर्पल कॅप जिंकणारा भारतीय संघाचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याला सोशल मीडियाचा बादशाहही म्हटले जाते. सोशल मीडियाचे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर युझी अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असतो.

त्याची पत्नी धनश्रीही सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. आपल्या डान्सच्या अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. सेलेब्स आणि सेलिब्रिटींसाठी त्यांच्या चाहत्यांशी जोडण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. पण कधी कधी हा सोशल मीडिया या सेलिब्रिटींना बुडवतो.

चहलदेखील आता त्याचा बळी पडला आहे. सध्या एका चॅटचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा जादुई लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने एके दिवशी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एका मुलीला मेसेज केला होता, त्याचा स्क्रीनशॉट त्या मुलीने सगळीकडे व्हायरल केला होता ज्यामुळे युजवेंद्र चहलला खुप ट्रोल केलं जात होतं.

वास्तविक, एका मुलीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक हॉट फोटो शेअर केला होता. ज्यावर युजवेंद्र चहलने प्रतिक्रिया देताना ‘नाईस वन’ लिहिले होते. त्याचवेळी चहलच्या या मेसेजचा स्क्रिनशॉट मुलीने घेतला आणि तो तिच्या स्टोरीमध्ये टाकला आणि तो सार्वजनिक केला.

हा स्क्रीनशॉट शेअर करताना मुलीने चॅटमध्ये काय काय बोलणे झाले लिहीले होते. युझवेंद्र चहल जेव्हा नाईस वन म्हणाला तेव्हा मुलीने त्याला प्रत्युत्तर दिले होते की, तुम्हाला वाटत असेल ती मी आहे पण ती मी नाहीये. यावर प्रतिक्रिया देताना चहलने लिहिले की, मला माफ कर माझ्या मित्राने तुला मेसेज केला, मी तुला मेसेज केला नाही.

चहलची माफी मागणाऱ्या या मेसेजवर हसताना मुलीने ‘काही हरकत नाही’ असे लिहिले. तो मेसेज चहलने किंवा त्याच्या कुणा मित्राने पाठवला होता हे आजपर्यंत उघड झालेले नाही. मात्र या संपूर्ण घटनेबाबत चहलने आतापर्यंत मौन बाळगले आहे. पण आता आयपीएलनंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण…; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
हार्टअटॅकआधी केकेला जाणवली होती ‘ही’ लक्षणे, तुम्हीही ‘या’ ७ लक्षणांकडे कधीच नका करु दुर्लक्ष
मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण, वाचा नक्की काय घडलं होतं ४० वर्षांपूर्वी
थेट मुळावर घाव! सोनिया आणि राहूल गांधींचा पाय खोलात; ईडीने उचलले मोठे पाऊल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now