Share

‘किलोनी सोने, कोट्यावधींची कॅश’; रेल्वे अधिकाऱ्याकडे सापडले करोडोंचे घबाड, पाहून CBI लाही फुटला घाम

सीबीआयने भुवनेश्वरमधील रेल्वेच्या निवृत्त मुख्य वाणिज्य व्यवस्थापकाच्या आवारात छापा टाकून 17 किलो सोने आणि 1.57 कोटी रुपये रोख जप्त केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी या छाप्याची माहिती दिली. एजन्सीने 3 जानेवारी रोजी प्रमोद कुमार जेना (1989 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी) यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

प्रमोद कुमार जेना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त झाले होते. निवृत्त अधिकाऱ्यावर त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या मालमत्तेवर छापा टाकला. जेव्हा सीबीआयने छापा टाकला तेव्हा रोकड आणि सोने पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. संपत्तीची जमवाजमव करता करता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भुवनेश्वरमधील प्रमोद कुमार जेना यांच्या घराची झडती घेतली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दरम्यान त्यांना त्यांची वाढीव संपत्ती जप्त करण्यात यश आले. सीबीआयने प्रमोद कुमार जेना यांच्या घरातून 1.57 कोटी रुपये रोख, 17 किलो सोने आणि दागिने जप्त केले आहेत.

ज्याची किंमत 8 कोटी ते 10 कोटींच्या दरम्यान सांगितली जात आहे. याशिवाय बँक आणि टपाल जमा पावत्यांसह अडीच कोटी रुपये आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. छाप्यामध्ये अडीच कोटी रुपयांच्या पोस्टल डिपॉझिट आणि मालमत्तेशी संबंधित इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

जेना यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोप केला गेला आहे की, 1 एप्रिल 2005 पर्यंत जेना यांच्याकडे बँक बॅलन्स आणि प्लॉटच्या रूपात 4.55 लाख रुपयांची संपत्ती होती. 31 मार्च 2020 पर्यंत ती वाढून 4.33 कोटी रुपये झाली.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या काळात जेना यांचे उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब केला असता, 1.92 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत ते कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ही रक्कम त्याच्या या कालावधीतील वास्तविक उत्पन्नापेक्षा 59.09 टक्के अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या
गुगलने २८ वर्षांसाठी नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा, महिन्याचं भाडं ऐकून चक्रावून जाल 
सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..
कुत्र्यापासून वाचला पण.., डिलीव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
दोन मुलींनंतर मुलगा झाल्याने नवस फेडायला पशुपतीनाथला गेला पण विमान अपघातात काळाने घातला घाव

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now